
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक,न्यायलयीन चौकशी समितीचा मुंबई हायकोर्टात अहवाल सादर, 5 पोलिसांवर ठपका
▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
▪️ एकनाथ शिंदे नाराज, नवा ‘उदय’ होणार; संजय राऊतांचा दावा, दावोसला पोहताच उदय सामंत म्हणाले ‘हा राजकीय बालिशपणा’
▪️ एवढी वर्षे काम केलंय, काहीतरी अपेक्षा ठेवणं यात वावगं काय? नाराजीच्या चर्चेवरून दरेगावातून एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
▪️ उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास बैठक; मविआ, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर चर्चा, संतोष देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चावरही चर्चा
▪️ राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल
▪️ कोलकाता बलात्कार प्रकरणातील ‘राक्षसा’ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या
▪️ धनंजय मुंडेंना पाठिशी घातल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे, मराठा कार्यकर्ते आक्रमक
▪️ सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट इशारा
▪️ सैफ अली खानच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा
