सामाजिक

श्री १००८ संभवनाथ दिगंबर जैन मंदिर, बजाजनगर येथे भगवान महावीर जन्म-कल्याण महोत्सव पालखी मिरवणूक काढुन साजरा

एकता जैन यांचा भक्तीमय संगीताचा कार्यक्रम झाला.

श्री १००८ संभवनाथ दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्म-कल्याण महोत्सव पालखी मिरवणूक 

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज

बजाजनगर येथे भगवान महावीर जन्म-कल्याण महोत्सव पालखी मिरवणूक काढुन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण दिलीपचंदजी अक्षय चुडिवाल, प्रभूचे पाद प्रक्षालन प्रथमेष राजेंद्र काला, जल अभिषेक प्रशांत वर्धमान अजमेरा, चतुर्थ कळश सौ. मंगला सुरेशचंद बड्जाते, शांतीमंत्र संदेश आदेश अजय कुमार पाटणी, अर्चना फळ सौ. वंदना जितेंद्र लविश जैनिश ठोले यांनी केले. महावीर भगवंताचे माता बनण्याचा मान सौ. नेहा महावीर लोहाडे, आत्या सौ. शांताबाई मदनलालजी काला तर प्रथम पाळणा हलविण्याचा मान सौ. वंदना राजेंद्र काला यांना मिळाला. याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन क्षु. अनंतमती माताजीच्या प्रेरणेने सौ. वंदना जितेंद्र चि. लविश जैनिश ठोले परिवार आणि श्रीमती रत्नमाला प्रकाशचंद सचिन अभिषेक पाटणी परिवार तर्फे करण्यात आले. संध्याकाळी श्रीजी ची आरती तसेच सौ. आरती जैन व सौ. एकता जैन यांचा भक्तीमय संगीताचा कार्यक्रम झाला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close