क्राइम

त्रासास कंटाळुन रोजगार सेवकाची आत्महत्या… रोजगार सेवक यांचे बेमुदत काम बंद आंदोलन 

गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली

त्रासास कंटाळुन रोजगार सेवकाची आत्महत्या… रोजगार सेवक यांचे बेमुदत काम बंद आंदोलन 

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी अमोल कोलते फुलंब्री.

फुलंब्री :तालुक्यातील ग्रा. प. गणोरी येथील दि 1 रोजी ग्राम रोजगार सेवक श्री ज्ञानेश्वर कोंडीबा गायकवाड गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली .यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने आज पंचायत समिती फुलंबी येथे निवेदन दिले त्यामध्ये असे लिहिले आहे की .गोरी येथील रोजगार सेवक श्री ज्ञानेश्वर कोंडीबा गायकवाड यांनी म.ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करत असताना होणारा मानसिक ताण तणाव जसे कि वैयक्तिक व सार्वजनिक कामे, सौशन ऑडीट चा अतिरिक्त त्रास, वेळेवर मानधन न मिळणे तसेच मिळणाऱ्या अल्प मानधनातून कुटुंबाचा उदर निर्वाह न होणे इत्यादी सर्व कारणाने व त्रासास कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्या मुळे जो पर्यंत त्यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळत नाही तो पर्यंत तालुका ग्रामरोजगार सेवक संघ फुलंबी तालुक्यांच्या वतीने दिः०२/०१/२०२५ पासून म.ग्रा.रो.ह.योजनेच्या सर्व कामावर बेमुदत कामबंद आंदोलन चालु केले आहे.

 प्रमुख मागण्या

१) आत्महत्या ग्रस्त रोजगार सेवकांच्या कुटुंबाला तात्काळ भरीव आर्थिक मदत मिळावी.

२) चुकीच्या पद्धतीने होणारे सामाजिक श्वसन थांबवण्यात यावे.

३) ग्रामरोजगार सेवकांना विमाकवचं लागू करावे.

४) यापुढे अशा घटना घडू नये वा साठी शासनस्तरावरून वेळेवर मानधन अदा करण्यात यावी.

 या साठी आज मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रो.ह.यो.) जिल्हा परिषद छ. संभाजीनगर २. मा. तहसीलदार साहेव तथा ता. कार्यक्रम अधिकारी तहसील कार्यालय फुलंब्री यांना निवेदन दिले आहे यावर जिल्हा अध्यक्ष सखाहरी विनोरकर ,तालुकाध्यक्ष आत्माराम गायकवाड , प्रसिद्धीप्रमुखसमाधान नवले , राज्य कार्य अध्यक्ष रेहिस पठाण, जावेद पटेल जिल्हा उपअध्यक्ष, रावसाहेब डकले,बबन मंदाडे,रवींद्र पळसकर,अक्षय जाधव,विजय जाधव,भास्कर डकले,सुनील गाडेकर सचिव ,राजू जगताप,ज्ञानेश्वर वाडेकर,ज्ञानेश्वर जाधव,विष्णू साबळे, सखाहरी बिल्डे कर यांच्या निवेदनावरती साक्षऱ्या आहे. ज्ञानेश्वर सहाने तालुकासेवक , अजिनाथ वहाटुळे ता.उप , संजय साळुंके ,रामेश्वर कोलते, सुनिल सोळुंके ,विलास दाभाडे ,सतिश वाघ ,आदी रोजगार सेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close