
अल्पबचत जितकी महत्त्वाची तितकेच मतदान महत्त्वाच
साक्षर इंडीया लाईव्ह न्यूज/अमोल कोलते/ फुलंब्री
फुलंब्री 106 विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या मुकुंदवाडी मधील सर्व वार्ड येथे भेट घेऊन विधानसभेच्या मतदानात जास्तीत जास्त मतदान करावे त्यासाठी जनजागृती करण्यात आली.
मागच्या वेळी मुकुंदवाडी क्षेत्रात 50% पेक्षा कमी मतदान झाले होते. यावेळी कुणीही घरी न राहता मतदान करावे असे आवाहन महिला बचत गटाच्या महिलांना करण्यात आले. अल्पबचत ही भविष्याची गुंतवणूक म्हणून जशी महत्त्वाची आहे तसेच मतदान सुद्धा लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यात आले. मतदानाच्या बाबतीत आयोगाने केलेल्या विविध सुधारणा, अपंग व 85 वर्षांवरील वयोवृद्धांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा, मतदान केंद्रावरील पाळणाघर व सर्व सुविधा याबाबतीत सर्व महिला बचत गटाच्या सदस्यांना माहिती देण्यात आली. तेव्हा त्यांनी आम्ही मतदान नक्की करणार असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा कानगुले,स्वीप कक्ष प्रमुख क्रांती धसवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जगन ढोके , नेमिनाथ दुधे,योगेश निकम,देविदास तुपे,संतोष जाधव,काकासाहेब थोरात हे जनजागृतीचे काम करत आहेत.
