नोकरी संदर्भबिझनेसशैक्षणिक

रोजगार मेळाव्यातून 331 उमेदवारांची निवड…

सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

रोजगार मेळाव्यातून 331 उमेदवारांची निवड…

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी:राजू जंगले वाळूज

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य आणि हाय-टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यातून 331 उमेदवारांची निवड…

दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी व हायटेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा कॉलेज कॅम्पस, बजाज नगर एम.आय.डी.सी वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्रीमती विद्या शितोळे, उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांनी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये 100 रोजगार मिळावे आयोजित करून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे शासकीय उद्दिष्ट असल्याचे सांगितले. सदर रोजगार मेळाव्यात उपलब्ध रोजगार संधीचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. मेळाव्यामध्ये करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन सत्रातून मुलाखत कौशल्य आत्मसात करावी. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली. त्यानंतर श्रीमती ऋजुता बनकर, सहाय्यक संचालक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रधानमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेची माहिती दिली व उमेदवारांना सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सदर मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून उपस्थित असलेले श्री. अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष, मसिआ यांनी उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये अनुभव घेऊन स्वतःचा व्यवसाय व उद्योग धंदा चालू करण्यासाठी प्रेरित केले, तसेच भारतीय ग्रामीण पुनर्रचना या संस्थेचे, सचिव, व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एकनाथराव जाधव यांनी एम.आय.डी.सी.मध्ये उपलब्ध संधीचा व राज्य शासनामार्फत तसेच संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा व आपले आयुष्यमानाचा दर्जा उंचवावा असे आवाहन केले. 

या रोजगार मेळाव्यामध्ये वोखार्ड रिसर्च सेंटर, रत्नप्रभा मोटार्स, फोर्ब्स प्रेसिशन टूल्स अँड मशीन पार्ट्स, लिभेर अप्लायन्सेस प्रा. लि., अलंकार ग्रुप, ग्रीव्हज कॉटन प्रा. लि., ओखार्ड लिमिटेड., पॅरामल मशिनरी इं.प्रा.लि., नवभारत फर्टीलायझर्स लिमिटेड,एक्सेल प्लेसमेंट, पगारिया ऑटो, देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, अजंता फार्मा लिमिटेड, सवेरा फार्मा, मायलन लेबोरेटरी लिमिटेड, ओम साई मॅन पावर, स्टरलाईट टेक्नॉलॉजी, लुपिन लिमिटेड, अमाधने प्रायव्हेट लिमिटेड, इंडोरेन्स लिमिटेड, एक्साइड इंडिया लिमिटेड. इत्यादी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्तयांनी सहभाग दर्शवून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 

या रोजगार मेळाव्यातून 331 उमेदवारांची प्राथमिक व 148 उमेदवारांची अंतिम नोकरीसाठी निवड करण्यात आली..

हा रोजगार मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सहसचिव श्री. अमन जाधव सर,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य, उपायुक्त, श्री सुरेश वराडे, श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीचे, प्राचार्य डॉ. संतोष शेळके, हाय-टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे, प्राचार्य, डॉ. गोविंद ढगे, हाय-टेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ. शिराळे, मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे, प्राचार्य, डॉ. सुधीर वैद्य, प्रशासकीय अधिकारी, भागचंद जाधव, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी श्रीमती पल्लवी भोसले, जनार्दन भोर, सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close