ज्ञानदीप इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नाटीका, गीते, काव्य आदी कलाप्रकार सादर केले.

ज्ञानदीप इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज वाळूज महानगर प्रतिनिधी-राजू जंगले
बजाजनगर औद्योगिक परिसरातील अल्पावधीतच नागरीकांच्या हक्काची, नावलौकिक असलेली ज्ञानदीप इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे अध्यक्ष करवीर कुटोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कुटोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमा निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित शाळेतील शिक्षीका छाया बालकुंदे,अहिरे पल्लवी ,शेंडे सौरभ, पाटील रत्नेश,अडागळे श्री ,तुपे यश, शिंदे साईशा, जाधव आदिनाथ यांनी नाटीका, गीते, काव्य आदी कलाप्रकार सादर केले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील पुजा कुंदे , मिनाक्षी लोलसुरे, सुरेखा मावळे, सुरेखा कळे ,छाया बालकुंदे, संगिता बोरसे, अश्विनी मते ,उमा चिल्लाळ, शितल शिल्लोडे, स्वाती शिंदे, आहेर श्रद्धा, अल्हाट वैशाली, पवार सोनाली, देशमुख प्रियंका, पाटील भाग्यश्री,भुसारे जयश्री, थोरात स्वाती, मोरे कल्पना, कासलीवाल साक्षी आदींनी परिश्रम घेतले.
