
🤑 ‘या’ तारखेला शेतकर्यांना खुशखबर मिळणार
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
👨🌾 देशातील शेतकऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्या दरम्यान एक मोठी घोषणा करणार आहेत.
💥 शेतकरीवर्ग पीएम किसान योजनाचा 19 वा हप्ता कधी जमा होणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र आता ही प्रतिक्षा संपणार आहे.
🤑 कारण येत्या 24 फेब्रुवारीला शेतकर्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
📃 तसेच यावेळी देशातील जवळपास 13 कोटी शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. मात्र त्याआधी पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
🌐 शेतकरी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
