क्राइम

वाळूज वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

वाळूज वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वाळूज महानगर / राजु जंगले

वाळूज महानगर परिसरातील ओॲसीस चौकात वाहतूक पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कारवाई करत असताना एका व्यक्तीने पोलिसांशी वाद घालत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ओयासीस चौकात वाहतूक नियंत्रण असताना MH 43 X 4093 क्रमांकाच्या इर्टिका कारचा चालक रस्त्यात वाहन अडवून प्रवाशांची सोय करत होता. पोलिसांनी त्याला गाडी काढण्यास सांगितले असता, संबंधित इसमाने आक्रमक होत पोलिसांशी वाद घातला.वाहतूक पोलीस कर्मचारी ई-चलन काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांचा कॉलर पकडून मारहाण केली. तसेच त्याच्या गाडीतील लाकडी दांडक्याने एकाला मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोराचे नाव एजाज सय्यद मोहम्मद अली (वय 44, रा. सलामपुरेनगर, पंढरपूर) असे आहे. दरम्यान, गाडी चालक रोहित मधुकर दळवी (वय 21, रा. अंबुर्ती चौक, वडगाव को.) याचे देखील नाव समोर आले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close