सामाजिक

पाडळी तांडा नंबर 3‌ लिलाबाई मांगीलाल पवार यांच्या हस्ते पाणंद रस्त्याचे उद्घाटन

यावेळी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

पाडळी तांडा नंबर 3‌ लिलाबाई मांगीलाल पवार यांच्या हस्ते पाणंद रस्त्याचे उद्घाटन 

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

पैठण तालुक्यातील पाडळी गाजीपुर ग्रामपंचायत अंतर्गत तांडा नंबर 3 शेतकरी लालू पांडू पवार ते कांताबाई पंडित चव्हाण यांच्या शेतापर्यंत एक किमी रस्त्याचा प्रश्न मिटला आहे.

या कामासाठी छ संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे तसेच पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विलासबापू भुमरे यांनी निधी मंजूर केला आहे. रस्ताच्या कामास सुरुवात झाल्याने तांद्यातील शेतकऱ्यांचे शेतामधील मालाची वाहतूक समस्या मिटली आहे. गाव व शेतामध्ये आणि वाड्या-वस्त्यांची जोडणी करण्यासाठी ही योजना लाभदायक व वरदान ठरत आहे. संबंधित शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत असून पाणंद रस्त्यामुळे ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनासाठी वरदान ठरत आहे. तालुक्यात पाणंद रस्त्यांच्या कामांना मान्यता मिळालेली आहे. आमदार विलास भुमरे यांच्या मतदार संघातील पाडुळी‌ येथील ‌तांडा नंबर 3 शेतकरी लालू पांडू पवार यांच्या शेतापासून ते कांताबाई पंडित चव्हाण यांच्या शेतापर्यंत एक किमी चा हा पाणंद रस्ता मंजूर झाला असून त्याचे कामही जोरात चालू आहे . शेतातील‌‌ पाणंद रस्त्याचे कायापालट होणार असल्याने खासदार संदिपान भुमरे व आमदार विलासबाप्पू भुमरे यांच्या विषयी शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त होत असल्याचे‌ सामाजिक कार्यकर्ते मांगीलाल गेमा पवार तसेच सरपंच लिलाबाई मांगीलाल पवार यांनी  सांगितले आहे. या पाणंद रस्त्यामुळे आता परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यावेळी सरपंच लिलाबाई मांगीलाल पवार, उपसरपंच दत्ता बांडे, ग्रामसेविका देहडरिया मॅडम, मांगीलाल गेमा पवार,चंद्रकांत हूड, प्रकाश हुड, संदीप हुड, प्रदीप गायकवाड पुष्पा गायकवाड नामदेव राठोड ,नामदेव चव्हाण ,वनसिंग राठोड, सुंदरलाल राठोड ,जानू जाधव ,अनिल पवार, निर्मला ताई, भानुदास चव्हाण, माणिक गायकवाड ,बाबासाहेब गायकवाड, केशव पवार ,दिनेश राठोड ,नानू जाधव,आदींसह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close