महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याची उत्सुकता
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी

साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याची उत्सुकता
▪️एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं, संजय राऊतांची टीका
▪️राज्यात भाजपचं सरकार, त्यामुळं अण्णा हजारे आजारी असतील आणि आराम करताहेत; रोहित पवारांचा खोचक टोला
▪️महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर संपन्न होणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती
▪️महायुतीची होणारी बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी दरेगावाकडे रवाना , महायुतीत घडामोडींना वेग
▪️वक्फ बोर्डाच्या निधीवरुन गोंधळात गोंधळ, अल्पसंख्याक विभागाकडून आधी 10 कोटींचा निधी जाहीर, मात्र नंतर जीआर मागे
▪️शिवशाही बसच्या भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
▪️तीन एकर मुरमाड जमिनीतही तब्बल 360 टन उसाचे विक्रमी उत्पादन; कोल्हापूरच्या आधुनिक शेतकऱ्यांची अनोखी यशोगाथा
▪️डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतरही 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर
▪️ फेब्रुवारी 2025 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता
