सामाजिक

तिसगाव येथे ग्रामदरबार

तिसगाव येथे ग्रामदरबार

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले वाळूज 

महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी ही स्वयंपूर्ण खेडी ही स्वयंपूर्ण स्वंयशासीत असावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा असते या अनुषंगाने ग्रामीण भागातील पुनरूत्थानासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले गेले प्रत्येक तालुक्यातील किमान एका गावात “एक दिवस गावकऱ्यांसोबत (ग्राम दरबार) उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात यावे .आशा मार्गदर्शक सुचना राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत या अनुषंगानेच आज दिनांक 2/7/25 ला ग्रामपंचायत तिसगाव या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनातून तसेच तिसगाव ग्रामपंचायत च्या सहकार्याने एक दिवस गावकऱ्यासोबत, ग्राम दरबार आयोजित करण्यात आला होता.

 सदर कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र दौलतबाद अंतर्गत तिसगाव येथे डाॅ.अभय धानोरकर जिल्हा अरोग्य आधिकारी, डाॅ.नागेश सावरगावकर यांचा मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीर,पंचायत समिती ,जिल्हा परिषद,अरोग्य विभाग,महसूल विभाग, शिक्षण विभाग व ईतर विभागातील माहीती याचे सखोल मार्गदर्शन शिवाजी साळुंके स.गट विकास अधिकारी, मुंगीकर सर उप आभियंता -सिंचन, देविदास मगर-विस्तार अधिकारी, ज्ञानदेव जायभाये-विस्तार अधिकारी पं.समिती, तालुका आरोग्य अधिकारी व डाॅ.परमेश्वर वाकदकर वैद्यकीय अधिकारी,रामदास पाथ्रे-विस्तार अधिकारी कृषी,मिना पाटील -अंगणवाडी पर्यवेक्षक, सोनार मॅडम -शाखा आभियंता ,डाॅ.तळेकर -पशु अधिकारी,साळवे मॅडम-मुख्याध्यापक तिसगाव, चिनकर मॅडम-कृषी अधिकारी यांनी दिली.

 या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत तिसगाव च्या सरपंच शकुंतला कसुरे, ग्रामविकास आधिकारी हरीश आंधळे, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, नागेश कुठारे,कृष्णा गायकवाड,गोदावरी कोल्हे,संगिता अंभोरे,मा.सरपंच अंजन साळवे,लालचंद कसूरे,ईश्वर तरैय्यावाले ,अण्णा जाधव, साहेबराव खरात संतोष दळे, अशोक त्रिभुवन व ईतर ग्रामस्थ महिला, उपस्थितीत होते.तसेच प्रा.अ.के.चे आरोग्य अधिकारी डॉ. शुभांगी जगताप, डॉ. शंकर देशपांडे, डॉ. अमोल जयस्वाल आणि श्री कल्याणकर, आरोग्य पर्यवेक्षक, श्रीमती चव्हाण आरोग्य सहायिका,श्रीमती स्वाती मात्रे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती सोनवणे, आरोग्य सेविका, श्री. वाहूळ आरोग्य सेवक, श्रीमती सुनिता गोरे,कल्पना वाघमारे, गटप्रवर्तक, श्री शेख वाहन चालक, सर्व आशा वर्कर,अंगणवाडी सेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी स्वयंसेविका हजर होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close