सामाजिक

आजपासून शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

गुन्हेगारी आटोक्यात येईल, अशी अपेक्षा संस्थानने व्यक्त केली आहे.

 आजपासून शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

💁‍♀️ शिर्डी साईबाबा संस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे. कारण आता मोफत जेवणासाठी भाविकांना कूपन दिले जाणार आहेत. 

👉 कारण शिर्डीमध्ये अलीकडे घडलेल्या काही गुन्हेगारीच्या घटनांमुळे संस्थानने हा निर्णय घेतला आहे. तसेच, खासदार सुजय विखे यांनी मोफत जेवणाचा गैरवापर होत असून, त्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

🎟️ तसेच भाविकांना साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काउंटरवर हे कूपन दिले जाणार आहेत. हे कूपन घेऊन भाविक प्रसादालयात जेवण करू शकतील. 

👉 तसेच हा नवा नियम आजपासून लागू होणार आहे. आता या निर्णयामुळे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल, अशी अपेक्षा संस्थानने व्यक्त केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close