शैक्षणिक

वाळूजमहानगर शालेय काव्यवाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

शांभवी भट प्रथम, साक्षी साळेवाड द्वितीय तर संस्कृती गावडे तृतीय

वाळूजमहानगर शालेय काव्यवाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी:राजू जंगले वाळूज छ्त्रपती संभाजी नगर 

शांभवी भट प्रथम, साक्षी साळेवाड द्वितीय तर संस्कृती गावडे तृतीय

15 शाळेतील 65 विद्यार्थ्यांनी काय वाचन स्पर्धेत नोंदवला सहभाग

            बालकुमार फाऊंडेशन आणि दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, बजाजनगर यांच्या वतीने आयोजित वाळूजमहानगर शालेय काव्यवाचन स्पर्धा शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाली. वाळूज महानगर परिसरातील पंधरा शाळेच्या एकूण 65 विद्यार्थ्यांनी काव्यवाचन स्पर्धेत सहभाग नोंदवला. आईवडील,शाळा, निसर्ग,भाऊ, मोबाईल, इंटरनेट, दुरावत चाललेले नातसबंध या विषयावरच्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेत स्व. भैरोमल तनवाणी विद्या मंदिराची शांभवी भट हिने प्रथम, शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव येथील साक्षी साळेवाड हिने द्वितीय तर भोंडवे पाटील पब्लिक स्कूल बजाजनगर येथील संस्कृती गावडे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. लालबहादूर शास्त्री विद्यालयाची अनुष्का राऊत व शंकराव पाटील विद्यालय रांजणगाव येथील रामेश्वरी धनवटे या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. भगवान महावीर विद्यालयाची ऋतुजा धोंडगे, लालबहादूर शास्त्री विद्यालयाची नंदिनी थोरात, शंकर पाटील विद्यालय रांजणगावची श्रावणी वडजे,रॉयल इंग्लिश स्कूल रांजणगाव येथील ईश्वरी सूर्यवंशी, भगवान महावीर ,बजाजनगर येथील स्नेहल कणके तर न्यू शहीद भगतसिंग रांजणगाव विद्यालयाची प्रतीक्षा बोरकर यांची विशेष उल्लेखनीय स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली.

विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, आणि पुस्तके तर सर्व सहभागी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध बालसाहित्य मा.गेणू शिंदे आणि सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखिका मा. अलकनंदा घुगे- आंधळे यांनी केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी घृष्णेश्वर सहकारी ग्राहक संस्थेचे मा. तुकाराम पोतले, मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.विजय राऊत, मा.विवेक जैस्वाल, एम्स करिअर अकॅडमी चे डॉ.दिनेश पाटील,प्राचार्य राहुल हजारे, उप प्राचार्य संजय सांभाळकर, बालकुमार फाउंडेशनचे गणेश घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी तुकाराम पोतले, राहुल हजारे, डॉ. दिनेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालकुमार फाउंडेशनचे गणेश घुले यांनी केले. या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या दहा स्पर्धकांना 44 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात बालकुमार मेळाव्यात मान्यवर बालसाहित्य लेखकांसोबत काव्य वाचनाची संधी मिळणार आहे. शालेय काव्यवाचन स्पर्धेसाठीडॉ दिनेश पाटील, एम्स करिअर इन्स्टिट्यूट,बजाजनगर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी कुलदीप साबळे तर आभार उत्कर्ष आहेर यांनी मांनले.

 स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य राहुल हजारे, बालकुमार फाऊंडेशनचे गणेश घुले, अविनाश सोनटक्के, किरण निकम,ईश्वर उमाळे,कुलदीप साबळे, कुमार बिरदवडे, चक्रधर डाके,मनोज जाधव,उत्कर्ष आहेर शुभम साबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close