शाळांना दर्जावाढ मान्यतेसाठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक
इरादा पत्र ऑनलाई किंवा ऑफलाईन असले तरी अंतिम मान्यता प्रसताव online सादर करावा.

शाळांना दर्जावाढ मान्यतेसाठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर: 29 मार्च: स्वयंअर्थ सहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) 2012 व महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) 2020 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नविन / दर्जावाढ शाळांना मान्यता मिळणे बाबत प्रस्ताव सादर करण्यात येतात. फक्त दर्जावाढ शाळा मान्यता प्रस्ताव सादर करण्यासाठी इच्छुक संस्थांनी www.mahasfs.org या संकतेस्थळाचा वापर करावा.
ज्या संस्थांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात दर्जावाढीने शाळा सुरु करण्याचा इरादा आहे अशा संस्थांनी आपल्या शाळेचे दर्जावाढ प्रस्ताव सदर संकेतस्थळावर online दिनांक 30 जुन 2025 पुर्वी सादर करावेत. त्यानंतर सादर होण्या-या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. नविन शाळांना इरादा पत्र मिळण्यासाठी online अर्ज स्विकारण्यात येत नाहीत याची जाणीव आपणास करुन देण्यात येत आहे. ज्या शाळांना दर्जावाढ अथवा नविन शाळा मान्यता ऑफलाईन इरादा पत्र प्राप्त आहे अशा शाळांनी देखील इरादा पत्रातील अटी शर्ती नुसार online प्रस्ताव दाखल करावेत. इरादा पत्र ऑनलाई किंवा ऑफलाईन असले तरी अंतिम मान्यता प्रसताव online सादर करावा. वरील प्रमाणे निर्देश सर्व शिक्षणाधिकारी यांच्या दिनांक 21 मार्च 2025 रोजीच्या बैठकीत मा सदस्य सचिव, राज्य स्तरीय प्राधिकरण तथा सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत.
अशी माहिती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
