सामाजिक

वाकोद येथील म्हसोबा महाराज यात्रेला आजपासून सुरुवात

वाकोद येथील म्हसोबा महाराज यात्रेला आजपासून सुरुवात

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

फुलंब्री तालुक्यातील वाकोद येथे 
 दिनांक 18 एप्रिल 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी पुजारी यांच्या घरातून दरवर्षीप्रमाणे म्हसोबा महाराज यांचा साज ची मिरवणूक निघते . म्हसोबा महाराजांचा साज शृंगार व पूजा अर्चना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते दुपारी अकरा वाजेपासून नवस फेडण्याचा कार्यक्रम चालू होतो. तसेच दुपारी चार वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. व संध्याकाळपासून देवी देवतांचे सोंग निघण्यास सुरुवात होते असा कार्यक्रम सकाळपर्यंत चालतो. व दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा असतो. अशी माहिती पुजारी विश्वनाथराव भागाजी गनपुरे यांनी साक्षर इंडिया लाईव्ह ला दिली.

या यात्रेला येणाऱ्या भाविक भक्तांचे  गावकऱ्यातर्फे व पुजाऱ्यांतर्फे  सर्वांचे स्वागत अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close