
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय? आता एकनाथ शिंदेंना कोणते अधिकार?
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
महायुतीच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मात्र राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अधिकार काय असतो हे आपण जाणून घेऊयात…
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय? :
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी जबाबदारी दिली आहे.
विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहातात. या कालावधीमध्ये महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली जात नाही.
तसेच प्रशासनाचं काम सुरळीत व्हावं म्हणून ही जबाबदारी दिली जाते. याशिवाय काळजीवाहू मुख्यमंत्री नेहमी एक तात्पुरता प्रशासन असतो. त्याचे प्रमुख कार्य म्हणजे सरकारची रोजची कामे आणि स्थिती सामान्य ठेवणे हे आहे.
