
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळच्या घडामोडी
▪️ ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
▪️ एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आमदार आदित्य ठाकरेंच्या सूचनेने ठाकरेंचे खासदार नाराज असल्याची चर्चा
▪️ पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेल्या 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10 हजार रुपयांचा पुरस्कार मिळणार, आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा
▪️ मंत्री धनंजय मुंडेंना परळीच्या फौजदारी न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस,विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबतचा उल्लेख टाळल्याचा आरोप
▪️ लाडकी बहीण योजनेचा फटका, अर्थखात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री, वार्षिक तरतुदीमधील 70 टक्के पर्यंतच रक्कम खर्च करण्याचे निर्देष
▪️ राज्यात जीबीएसचं थैमान! पुण्यात आणखी एक बळी, रुग्णसंख्या 200 पार, राज्यातील मृतांची संख्या 8 वर
▪️ बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत कावत यांचा निर्णय
▪️ महिला बालविकास विभागाचा धमाका, तब्बल 18 हजार 882 पदं भरणार, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचाही समावेश
▪️ आम्हाला कधी कधी पवार साहेबांचा राग येतो की हे असं का करतात, पण तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, जितेंद्र आव्हाडांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर
▪️ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वाद घालणे पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना महागात पडलं, शाहिन आफ्रिदीसह 3 खेळाडूंवर आयसीसीची दंडात्मक कारवाई
