Gamesशैक्षणिक

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांच्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे,कल्पना पदकोंडे, धनराज कांबळे,सर्व पंच,केंद्र प्रमुख शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालकांच्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न.⚽🏏🤼‍♂️🤾🏻‍♀️🎖️🏅🏆🏀⛹🏻‍♀️⛹🏻‍♂️

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी :राजू जंगले छ्त्रपती संभाजी नगर 

  छत्रपती संभाजी नगर: मा.मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मिना साहेब यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी (प्रा.) जयश्री चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा राजे संभाजी भोसले सौनिक स्कुल कांचनवाडी येथे अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ सुनिल भोकरे साहेब, गटविकास अधिकारी श्री शिवाजी साळुंके सर व गटशिक्षणाधिकारी दिपाली थावरे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होऊन मोठया उत्साह मध्ये चालू झाल्या.

         कबड्डी,खो-खो,व्हॉलीबॉल, संगीत खुर्ची,थाळी फेक,गोळा फेक रस्सी खेच, या सारख्या अनेक स्पर्धा विद्यार्थी, पालक यांच्या संपन्न झाल्या.

         ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासा सोबत खेळणे ही आवश्यक आहे आणि त्यांची खेळात रुची वाढावी आणि मुलांनी आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात आपले करियर करावे असे सूचक मार्गदर्शन डॉ सुनील भोकरे सर यांनी करून या कार्यक्रमाची सुरवात करून दिली.

     विजयी संघ, पालक विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह पाहून असे जाणवत होते की ह्या स्पर्धा बक्षिस किव्हा जय पराजय साठी नसुन भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरतील.

      या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे,कल्पना पदकोंडे, धनराज कांबळे,सर्व पंच,केंद्र प्रमुख शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.

⚽🏏🤼‍♂️🤾🏻‍♀️🎖️🏅🏆🏀⛹🏻‍♀️⛹🏻‍♂️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close