राजकियराज्य

बांगलादेशी हिंदू के सन्मान में, शिवसेना मैदान में

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने क्रांती चौकात तीव्र आंदोलनाचे आयोजन

बांगलादेशी हिंदू के सन्मान में, शिवसेना मैदान में

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने क्रांती चौकात तीव्र आंदोलनाचे आयोजन

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क (वृत्तसंस्था)

छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशी हिंदूंवर सातत्याने होणाऱ्या अन्याय, अत्याचार व दडपशाही विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष रस्त्यावर उतरणार असून सोमवार, ता. २ डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता क्रांती चौकात तीव्र आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे आंदोलन आयोजित केले आहे. 

केंद्र सरकार बांगलादेशी हिंदूंवर होणारे अन्याय, अत्याचार गप्प बसून बघत आहे.एकीकडे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय दिला जात असताना तेथील हिंदू निराधार झाला आहे. मागील काळात केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नागरिकत्व नोंदणी कायदा करण्याचा निर्णय घेऊन स्थलांतरित पीडित हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याचे ठरविले होते. मात्र, सध्या बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या संख्येने अत्याचार होत असताना केंद्र सरकार गप्प बसून आहे. 

बांगलादेशी हिंदू समाजातील जनतेवर होणाऱ्या अत्याचार निषेधार्थ होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सह संपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगर प्रमुख राजू वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना,सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी सहभागी होण्याचे, आवाहन शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, हरिभाऊ हिवाळे, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार,सुनिता देव,अनिता मंत्री, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशाताई दातार, जिल्हा समन्वयक विद्याताई अग्निहोत्री,महानगर संघटक मीना फसाटे, सुकन्या भोसले, शहर संघटक सुनिता सोनवणे, सुनिता औताडे, वैशाली आरट, भागुआक्का शिरसाठ, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, सहसचिव ॲड धर्मराज दानवे व जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close