सामाजिक

महाड येथे भिमसृष्टी साकारणार; आमदार भरत गोगावले यांची घोषणा

सरकारकडून भिमसृष्टी उभारली जाईल अशी घोषणा गोगावले यांनी केली. 

महाड येथे भिमसृष्टी साकारणार; आमदार भरत गोगावले यांची घोषणा

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क 

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच आता महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारणार असल्याची मोठी घोषणा आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने आमदार भरत गोगावले यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर उपस्थित राहून डाॅ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.

 तसेच चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच सात कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यानिधीचा वापर करून कामे केली जातील तसेच शिवसृष्टी प्रमाणेच भिमसृष्टी देखील साकारण्याचा मानस त्यांचा व्यक्त केला. तसेच या सरकारकडून भिमसृष्टी उभारली जाईल अशी घोषणा गोगावले यांनी केली. 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close