
जयहिंद पब्लिक स्कूलचे खो- खो स्पर्धेत यश
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वाळूज महानगर प्रतिनिधी:राजू जंगले
युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार द्वारे नेहरू युवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर. जिल्हास्तरीय क्रीडा प्रतियोगिता 2024-25 स्पर्धा हमखास मैदान येथे घेण्यात आल्या त्यामध्ये जयहिंद पब्लिक स्कूल,रांजणगाव(शे.पू.) शाळेतील मुलींनी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले व राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी विद्यार्थिनींची निवड झाली त्याबद्दल संस्थेच्या सचिव चंद्रिका देशमुख संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आशिष देशमुख व व्यंकटराव कोमटवार ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ संजय काळे,माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका नमिता मार्कंडे ,प्राथमिक विभाग मुख्याध्यापक संदिप गायकवाड तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन करून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
