Gamesशैक्षणिक

देवगिरी महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

स्पर्धेमध्ये 3 सुवर्णपदक, 2 रोप्य पदक, 2 कांस्यपदक पटकावले

देवगिरी महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था 

देवगिरी महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. बेंगलोर येथे झालेल्या सहावी भारतीय खुली पैरा जलतरण स्पर्धेमध्ये 3 सुवर्णपदक, 2 रोप्य पदक, 2 कांस्यपदक पटकावले, व छत्तीसगड येथे झालेल्या आंतरशालेय (राष्ट्रीय) महाराष्ट्र बास्केटबॉल संघात आदित्य खांडेकर याची निवड झाली. तर आंतर शालेय (राष्ट्रीय) महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात मिताली गवळी छत्रपती संभाजीनगर येथे होणारे स्पर्धेसाठी निवड झाली.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा. आ. सतीश चव्हाण, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथरीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य एन. जी. गायकवाड, उपप्राचार्य सुरेश लिपाने, क्रीडा विभाग प्रमुख राकेश खैरनार

याप्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य माननीय पंडितराव हर्षे, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथरीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा. विजय नलावडे या सर्व मान्यवरांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश खैरनार यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. मंगल शिंदे, प्रा. कृष्णा दाभाडे, प्रा. अमोल पगारे, प्रा. शुभम गवळी, श्री शेख शफिक यांचे सहकार्य लाभले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close