ग्रीन ग्लोब विद्या मंदिर चा 100% निकाल गुणवंतांचा सत्कार
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सचिव शाळेच्या मुख्याध्यापिकासह सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले

ग्रीन ग्लोब विद्या मंदिर चा 100% निकाल गुणवंतांचा सत्कार
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क वृत्तसंस्था छ्त्रपती संभाजी नगर
गुलमोहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन ग्लोब विद्या मंदिर, देवळाई परिसर छत्रपती संभाजी नगर, या प्रशालेच्या माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयाचा शंभर टक्के 100% निकाल लागला असून यात ईश्वर गोंड या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक, हर्षाली पवार या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक, मयूर हरकळ या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक तर वरद तुपे व प्रतीक्षा दसपुते यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
सलग चौथ्यावर्षी 100% निकाल देण्यासाठी,संस्था व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन पुन्हा घवघवीत यश संपादन केलेले आहे.
सर्व गुणवंत आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती दाभाडे, संस्थेचे सचिव डॉ.श्री. ऋषिकेश दाभाडे, श्री.आळंजकर सर मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना पवार आणि सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.
