अल्पावधीतच सिद्धिविनायक पब्लिक स्कूल हि शाळा यशाच्या शिखरावर – पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे
राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

अल्पावधीतच सिद्धिविनायक पब्लिक स्कूल हि शाळा यशाच्या शिखरावर – पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वाळूज महानगर प्रतिनिधी राजू जंगले
वाळूज औद्योगिक वसाहत हि आशिया खंडातील सर्वात मोठी नागरी वसाहत आहे.या ठिकाणी देश आणि विदेशातून अनेक जण उदरनिर्वाह निमीत्ताने आलेले आहेत.
माणसाच्या विकासाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही.या स्पर्धेच्या युगात अल्पावधीतच सिद्धिविनायक पब्लिक स्कूल हि शाळा यशाच्या शिखरावर पोहोचवेल असे प्रतिपादन सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथील आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे यांनी या कार्यक्रमा प्रसंगी मत व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
सिद्धिविनायक पब्लिक स्कूल, बजाजनगर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोरख पगार हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे वाळूज पोलीस स्टेशन,पोलिस अंमलदार- मगर पोलीस हेड कॉन्स्टेबल- जालिंदर रंधे साहेब देविदास सूर्यवंशी केंद्र प्रमुख वाळूज ,शिरीष बडग सांख्यकी विस्तार अधिकारी,संस्थेचे सचिव राजेंद्र घटकर मंगेश शेळके, गोदावरी पब्लिक स्कूलचे संचालक वाहेद पठाण सर बालकवी किरण निकम कुमार बिरदवडे सागर सोनवणे पालक प्रतिनिधी बळीराम नागरे , समाधान हराळ , शरद कांडुरे आयोजक – मुख्याध्यापक इरफान शहा सर, पर्यवेक्षक – शाम टापरे सर ई. उपस्थित होते कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तसेच कार्यक्रमात मुख्य अतिथी पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करत असतांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. तर देविदास सूर्यवंशी केंद्र प्रमुख वाळूज यांनी विद्यार्थ्यांच्या कला – गुणांना वाव देऊन शाळेच्या प्रगती विषयी पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते, पारंपरिक नृत्य, लोकनृत्य, नाटिका, शिव चरित्र, इत्यादी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण नृत्या मधून चार उत्कृष्ट नृत्याला संस्थेच्या वतीने उत्कृष्ट बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. मिरा शिंदे, वैशाली सूर्यवंशी, कीर्ती चव्हाण, मीनाक्षी वसे, दीपाश्री काळे, भारती साळवे वैशाली टापरे, शुभांगी पवार, भारती पाटील या शिक्षक स्टाफ ने मेहनत घेतली. या संपूर्ण शिक्षकांना संस्थेच्या वतीने सम्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम टापरे यांनी केले तर मिरा शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
