राज्यशैक्षणिक

गुणवत्तावाढीसाठी आता शिक्षकांचेही ‘सक्षमीकरण’!

नवीन आराखड्यानुसार प्रशिक्षण : एप्रिल ते मे

गुणवत्तावाढीसाठी आता शिक्षकांचेही ‘सक्षमीकरण’!

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था 

 राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर ‘या’ दिवशी प्रशिक्षण; उन्हाळा सुट्टीतही नवीन अभ्यासक्रम आराखड्याचे धडे

जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय व खासगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून २० जानेवारीपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घेतले जाणार आहे. राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी नऊ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे

जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय व खासगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून आता २० जानेवारीपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घेतले जाणार आहे. राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी नऊ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचे वेळापत्रक सध्या निश्चित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी सध्या राज्य शासनाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सुरू केली आहे. आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) माध्यमातून पहिली व दुसरीच्या वर्गाचा अभ्यासक्रम निश्चित करून त्याची पुस्तके बालभारतीकडून छपाई करून घेण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षात बदलणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांचीही निर्मिती ‘एससीईआरटी’कडून सुरू झाली आहे. पण, या इयत्तेचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे. तत्पूर्वी, एप्रिल ते मे या उन्हाळा सुट्टीत शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्याचे नियोजन ‘एससीईआरटी’ व ‘डायट’कडून केले जात आहे.

राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे नियोजन

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने २० ते २५ जानेवारीपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून (एससीईआरटी) प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या शिक्षकांमार्फत ३ ते ७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावर आणि शेवटी ८ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तालुकास्तरावर सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजित आहे.

– जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर

पहिली, दुसरीची पुस्तके छपाई पूर्ण, आता…

राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून इयत्ता तिसरी ते दहावीच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती सुरू आहे. त्यासाठी विषयानुसार विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शासनाच्या मंजुरीनंतर त्या त्या इयत्तेचा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. दरम्यान, सध्या बालभारतीकडून पहिली व दुसरीच्या वर्गाच्या पुस्तकांची छपाई पूर्ण झाली असून आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरवातीला या दोन वर्गाचा अभ्यासक्रम बदलेल, असे ‘एससीईआरटी’तील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

शिक्षक सक्षमीकरणाचे वेळापत्रक

राज्यस्तरीय प्रशिक्षण : २० ते २५ जानेवारी

जिल्हास्तरीय प्रशिक्षण : ३ ते ७ फेब्रुवारी

तालुकास्तरीय प्रशिक्षण : ८ ते २८ फेब्रुवारी

नवीन आराखड्यानुसार प्रशिक्षण : एप्रिल ते मे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close