तिसगाव येथे रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करून ग्रामसभा बैठक संपन्न
रमाबाई आंबेडकर नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिसगाव येथे रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करून ग्रामसभा बैठक संपन्न
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज छत्रपती संभाजी नगर वाळूज प्रतिनिधी राजू जंगले
सविस्तर माहिती अशी की दिनांक 07/02/2025 शुक्रवारी रोजी तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा तिसगाव च्या सरपंच श्रीमती शकुंतला लालचंद कसुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती गावचे सरपंच श्रीमती शकुंतलाताई लालचंद कसुरे व ग्रामसेवक श्री हरीष आंधळे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार घालून साजरी करण्यात आली,
यावेळी ग्रामसेवक हरीष आंधळे यांनी ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली, तर श्री संजयजी जाधव यांनी पहिलाच ठराव आण्णा भाऊ साठे नगर व रमाबाई आंबेडकर नगर खवडा या वस्तिला नियमाकुलित करून येथील नागरीकांना नमुना नंबर आठ चा मालकी हक्काचा उतारा कसा देण्यात येईल हा ठराव मांडला ठराव मांडताच उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी टाळ्या वाजवून या ठरावाला सहमती दर्शविली,पुढे संजयजी जाधव यांनी,ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या कामाची व चालू असलेल्या कामाची माहिती दिली तसेच राजेश भैय्या कसुरे यांनी शासनाच्या योजना गावात कशा जास्त प्रमाणात आणता येईल व त्याच्या लाभ गावातील सर्व प्रत्येक लाभार्थ्यांना कसा मिळेल याची माहिती दिली.
यावेळी ग्रामस्थांनी आपापल्या अडचणी ग्रामसभेत मांडल्या व त्या जशाच्या तशा ग्रामसेवक हरीष आंधळे यांनी लिहुन घेऊन यावर शक्य त्या पध्दतीने पुर्ण करण्यास ग्रामपंचायत तत्पर असल्याचे सांगितले ,या ग्रामसभेला गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री ईश्वरसिंग तरैय्यावाले, श्री नितीन जाधव, तंटामुक्त उपाध्यक्ष श्री सोमनाथ महापुरेआण्णा ,श्री किशोर साळवे,सतिश महापुरे,शे अस्लम भाई,राजु जंगले,सुनिल जोगदंड,शशिकांत गोफणे, बाबासाहेब रायकर,आदी कार्यकर्ते व आण्णा भाऊ साठे नगर व रमाबाई आंबेडकर नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
