
पोलिस बॉईज असोसिएशन संघटनेचा अतुल सावे यांना जाहीर पाठिंबा
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
छ्त्रपती संभाजी नगर: पोलिस व पोलिस कुटंबांच्या विविध प्रश्नासाठी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेचा जाहीर पाठिंबा देत आसल्या बाबत चे पत्र नुकतेच औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांना पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य यांच्या उपस्थित देण्यात आले त्यात म्हंटले आहे की,
छत्रपती संभाजीनगर मतदार संघामध्ये आपण भाजपा म्हणून उमेदवार आहात पोलिस व पोलिस बॉईज पोलिस पाल्य पोलिस कुटंबांच्या विविध प्रश्नासाठी आपली भूमिका ठोसपणे मांडताल अशी आशा व्यक्त करत सर्व विषयांवर आपणास महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेचा जाहीर पाठिंबा देत आहे व आपल्या प्रचारात देखील सक्रीय सहभागी होणार आहोत. असे जाहीर पाठिंब्याचे पत्र देऊन आश्वासित केले आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष रवि भाऊ वैद्य,कोर कमिटी सदस्य गोकुळ दाभाडे,अध्यात्मिक आघाडी प्रदेश अध्यक्ष योगेश माऊली सूरळकर,युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रा.रवि अंभोरे,वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रमोद खाडे,विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष सागर बनसोडे,बाळकृष्ण शेवंते, लखन धायगुडे, सुनिल पारखे,शिवाजी निकम सह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
