
पोलीस बॉईज असोसिएशनची पश्चिम महाराष्ट्राची बैठक उत्साहात पार
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र ब्युरो रिपोर्टर नारायण महाराज बांबर्डे
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय दराडे बारामती व अहिल्यानगर पोलीस बॉईज महिला आघाडी सुनिता गुलाटी जामखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस बॉईज असोसिएशनची पुढील दिशा ठरवण्यात करिता पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाली.
या मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली
• या बैठकीमध्ये पोलीस व पोलीस कुटुंबीयांच्या व जनतेच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
• नवीन सरकार मध्ये स्वतंत्र गृह मंत्री असला पाहिजे.
• मागील शिंदे सरकारने अनेक जातीसाठी वेगवेगळे महामंडळ तयार केले त्याच धरतीवर पोलिसांच्या मुलांचीही तुकाराम ओंबळे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.
• बेरोजगार पोलीस पाल्यांना योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून त्याद्वारे उद्योग धंद्याचे निर्मिती करावी.
• 2013 मध्ये जी पोलीस कर्मचारी पीएसआय ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना तात्काळ पोलीस उपनिरीक्षक पदी रुजू करावे.
• प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या मुलांकरिता वस्तीगृहाची निर्मिती करण्यात यावी.
• पोलीस पाल्यांना शैक्षणिक आरक्षण मिळावे.
असे अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीत या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य राष्ट्रीय संघटक माणिक निमसे,कोर कमिटी सदस्य गोकुळ दाभाडे प्रदेशाध्यक्ष विकास सुसर, प्रदेश सहसचिव प्रमोद खाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अरुण सदाशिवे अरुण दाभाडे, उद्योग आघाडी प्रमुख दत्तात्रय धोकटे, विद्यार्थी आघाडीचे सागर बनसोडे, युवक आघाडी प्रमुख प्रा.रवी अंभोरे, सुनील पारखे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री दाभाडे,शितल खरात, वैशाली दवंडे, अंजुषा कुलकर्णी, संध्या जैन, अलका खरात, आशा खरात, मीना पवार, कुसुम हेगडे, व जामखेड तालुक्यातून अनुष्का वारे, उषा जास भाटी, कुंदा गुळवे, सुनीता कांबळे, देवशाला गुळवे, सुशीला गुळवे, उषा सदाफुले, ज्योती गायकवाड, शोभा सुरवसे, सोनाली दळवी, स्वाती पिसाळ, जामखेड तालुकाध्यक्ष अरुण शिरसाठ, महादेव रसाळ, सुधीर साठे, आनंद कोळपकर, विनोद परदेशी, सचिन बकरे, खंडू कांबळे, संजय गोरे, दिलीप देशमुख, भगवान नागरगोजे, अशितोष दराडे, शेख कैसर, प्रवीण मोरे आदी बैठकीत उपस्थित होते.
