
देवगिरी महाविद्यालयातील कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक राकेश खैरनार यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन-पुणे चा नामांकित महाराष्ट्र गौरव पुरस्कार- प्रदान करण्यात आला.
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज वृत्तसंस्था
छ्त्रपती संभाजी नगर:
प्रा.राकेश खैरनार यांनी क्रीडा क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट असे कार्य करत महाविद्यालयातील व मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय,राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी व पदक प्राप्त करून दिलेली आहे.
प्रा.राकेश खैरनार यांनी या पुरस्कारामुळे माझे क्रीडा क्षेत्रातील जबाबदारी अधिक वाढली असून क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान करणार असे मत त्यांनी व्यक्त केले.
दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी ध्वजारोहण प्रसंगी पुरस्कार प्राप्त राकेश खैरनार यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार श्री.सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य श्री.पंडितराव हर्षे, श्री.प्रदीप चव्हाण, कार्यकारणी सदस्य श्री.त्रिंबकराव पाथ्रीकर, डॉ.आदित्य येळेकर, श्री.विवेक जैस्वाल, प्रशासकीय अधिकारी प्रा.एफ.जी.माळी, सहप्रशासकिय अधिकारी प्रा.सुधीर श्रीखंडे,महविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ. रवी पाटील,उपप्राचार्य, गणेश मोहिते,उपप्राचार्य प्रा.नंदकिशोर गायकवाड, उपप्राचार्य,प्रा.सुरेश लिपाने,उपप्राचार्य, प्रा.विजय नलावडे, यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
