
चंपाषष्ठी सोहळ्यानिमित्त सप्ताहाला प्रारंभ
साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज महाराष्ट्र ब्युरो रिपोर्टर नारायण महाराज बांबर्डे
फुलंब्री तालुक्यातील श्री गुणेश्वर महादेव संस्थान मारसावळी येथे चंपाषष्ठी सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य सप्ताहाला आज प्रारंभ झाला असून या अनुषंगाने सर्व वारकरी मंडळी भाविक भक्त यांच्या उपस्थित विणा देखील उभा राहिला आहे.
या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर सजावट,वृक्षारोपण, दैनंदिन विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सोहळ्याचा प्रारंभ 30 नोव्हेंबर 2024 ते सांगता 07 डिसेंबर2024 असा या सप्ताहाचा कालावधी आहे..
त्या पार्श्वभूमीवर सर्व मित्र परिवार भक्त परिवार शिष्य परिवार साधुसंत ऋषीमुनी यांना देखील या अलौकिक अशा सप्ताहाचे आमंत्रण संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
