शैक्षणिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराची सांगता

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराची सांगता

साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज प्रतिनिधी राजू जंगले 

चिंचोली लिंबाजी : गणेशपुर येथे कला विज्ञान महाविद्यालय चिंचोली लिंबाजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रा.से. योजना शिबिराचा समारोप संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाला श्री.विजयकुमार ठक्कुरवाड डी वाय एस पी कन्नड, तसेच श्री.उल्हास पवार विशेष सरकारी वकील सत्र न्यायालय, श्री.रामचंद्र पवार ए. पी.आय. कन्नड, श्री डोईफोडे पी.एस.आय., महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मगर तसेच धारेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रामरावजी सपकाळ, जिल्हा समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर पाथ्रीकर, गट समन्वयक डॉ.गजानन चिट्टेवाड तसेच गावातील सरपंच, उपसरपंच,चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.


यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी डॉ संजय वाकळे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वंदना पाटील यांनी केले. व आभार प्रा. बाबासाहेब जंगले यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

श्री.विजयकुमार ठक्कुरवाड आपल्या भाषणामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी जिद्द,परिश्रम,मेहनत,चिकाटी च्या माध्यमातून यश संपादन करावे तसेच विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी मोबाईलचा वापर करावा व जागतिक ज्ञान प्राप्त करावे. तसेच सरकारी वकील श्री उल्हास पवार यांनी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यश संपादन करावे.


कार्यक्रमाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ प्रतिभा आघाडे,डॉ खंडागळे मॅडम, डॉ विक्रमसिंह पवार, राजेश कांबळे, डॉ पुरुषोत्तम मनगटे, यशवंत गाडे, डॉ सुनील काळे, डॉ उमाकांत गायकवाड,डॉ रामेश्वर राऊत, डॉ वंदना बनकर, डॉ.योगेश निकम, श्री आजिनाथ मनगटे, श्री अनिल जंजाळ, श्री कैलास पद्मे, श्री शेषराव मुरमुरे, श्री शिवाजी हाडे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close