आजपासून WPL ला सुरुवात… जाणून घ्या मोबाईलवर कुठे पाहता येतील सर्व सामने
आता तिसऱ्या सीजनचे जेतेपद कोण पटकावणार याकडे लक्ष असेल.

🏏 आजपासून WPL ला सुरुवात… जाणून घ्या मोबाईलवर कुठे पाहता येतील सर्व सामने
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क
💁♀️ क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण WPL म्हणजेच वुमन्स प्रिमियर लीग आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे.
📺 प्रेक्षकांना हे सामने स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येतील, तर मोबाईलवर हॉटस्टारवर पाहता येतील. सर्व टीम प्रत्येक संघाविरूद्ध 2-2 सामने खेळणार आहेत. तसेच हे सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू पार पडणार आहेत.
5️⃣ यंदाही मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे पाच संघ असणार आहेत.
🧐 तसेच WPL मध्ये मुंबईने एकदा आणि आरसीबीने एकदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तर आता तिसऱ्या सीजनचे जेतेपद कोण पटकावणार याकडे लक्ष असेल.
💥 WPL च्या संघाचे कर्णधार :
▪️ मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर
▪️ दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग
▪️ यूपी वॉरियर्स : दीप्ती शर्मा
▪️ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : स्मृती मानधना
▪️ गुजरात जायंट्स : अॅशले गार्डनर
