रांजणगाव शे.पुं येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

रांजणगाव शे.पुं येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी
साक्षर इंडिया लाईव्ह न्युज प्रतिनिधी राजू जंगले छ. संभाजी नगर
गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली दिनांक 30 तारखेला रात्री 8:30 वा. भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला 31 तारखेला सकाळी ८:३० वा. ब्राह्मण विधियुक्त पुजन करून दूध अभिषेक करण्यात आला व महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास दादा कोळेकर पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित सभापती साखराबाई तोगे राजू गवळी अनिल वाढोणकर विजय तोगे संजय तोगे विलास पाचपोळ राज येवले विठ्ठलराव वीर दत्तात्रय रोडगे राजू साबळे वडकुते पाटील सोनाग्रे साहेब सूर्यकांत सोडगीर बाबासाहेब रिटे गणेश तोगे राजू पिसाळ अन्नपूर्णा सोनाग्रे सविता शिंदे व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
