
साक्षर इंडिया लाईव्ह सकाळचा घडामोडी
▪️ राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुण्यात जलसंपदा अन् साताऱ्यात जलसंधारण प्रकल्पाचा जिल्ह्याला थेट लाभ
▪️ कृषिमंत्र्यांनी डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं, धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी; 88 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंजली दमानियांचा गंभीर आरोप
▪️ मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर, आयुक्त भूषण गगराणींनी दिली माहिती
▪️ संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने नामदेव शास्त्री महाराजांचे पुण्यातील कीर्तन रद्द, मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थानचा निर्णय
▪️ डरपोक गद्दार पळून गेले, पण माझा भाऊ वाघासारखा लढला; सूरज चव्हाणांना जामीन मिळताच आदित्य ठाकरेंचं ट्विट
▪️ अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; महिला व बालकल्याण विभागाकडे केला अर्ज, आता बँकेत पैसे येणार नाहीत
▪️ आधी म्हणाले, पंचांना गोळ्या घाला, आता डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा 2 दिवसांत परत करणार, चंद्रहार पाटील यांचा मोठा निर्णय
▪️ छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले, अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याने वाद
▪️ बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका, राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक, उत्तर प्रदेश, हरियाणातील सेंटर्सचा समावेश
▪️ 21 कोटींचं मानधन घेते, तरीसुद्धा सिक्योरिटी अन् फुल-टाईम ड्रायव्हर अफॉर्ड करु शकत नाही; दिग्गज दिग्दर्शकाचा करिनाला सणसणीत टोला
